एमआयडीसी भोसरीत दोघांना ऊसाने मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ३० - एमआयडीसी भोसरी परिसरात जुन्या वादातून चार जणांनी एका तरुणासह त्याच्या भावावर ऊसाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ मार्च रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी कॉर्नर येथील जय गणेश रसवंती गृह येथे घडली. याप्रकरणी शुभम सिद्धार्थ नवगिरे (वय २७, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांचा भाऊ बोलावल्याने ते घटनास्थळी गेले असता आरोपी आदित्य कांबळे (वय २४ वर्षे), प्रकाश विद्यागज (वय ३२ वर्षे), सारंग ओरसे व सुमित कांबळे हे पूर्वीच्या वादातून संगनमताने तेथे उभे होते. त्यावेळी फिर्यादीने विचारणा केल्यावर आरोपी आदित्य कांबळे याने “तु जास्त शहाणा झाला आहेस का?” असे म्हणत ऊसाने मारहाण केली. तसेच सारंग ओरसे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, फिर्यादीचा भाऊ मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला असता आरोपी प्रकाश विद्यागज व सुमित कांबळे यांनी त्यालाही ऊसाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीसांकडून सुरु आहे.