देहूरोड परिसरात बांधकाम साहित्य चोरीचा प्रकार उघड; एका कामगाराला अटक
पिंपरी, ता. २७ - देहूरोड परिसरातील आदर्शनगर येथे बांधकामासाठी ठेवण्यात आलेले सुमारे १ लाख ३ हजार ८०१ रुपये किमतीचे वायरचे बंडल चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका कामगाराला अटक करण्यात आली आहे.
ही घटना ४ मे ते ११ मे २०२६ या कालावधीत सॅन्टियागो कन्स्ट्रक्शन के विले शेजारी, आदर्शनगर, देहूरोड येथे घडली. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात २६ मे रोजी रात्री १०.२६ वाजता देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी समाधान राजाराम नवले (वय ३२, रा. फ्लॅट नं. १०२, पलाश २४ अपार्टमेंट, जुना आळंदी रोड, मोशी, पुणे) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी दत्तात्रेय अरुण पवार (वय ३८, रा. शिंदे पेट्रोलपंपामागे, विकासनगर, देहूरोड, ता. हवेली, जि. पुणे) याने बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी असलेल्या खोलीतून वायरचे बंडल स्वतःच्या फायद्यासाठी, फिर्यादीच्या परवानगीशिवाय चोरून नेल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०६ तसेच भारतीय दंड विधान कलन ३८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.