काळेवाडीमध्ये पोलिसांचा स्पा सेंटरवर छापा, वेश्या व्यवसाय उघडकीस, आरोपी अटकेत
पिंपरी, ता. २७ - काळेवाडी परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसायाचा प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई सोमवारी (ता. २५ मे) रात्री ९.५६ च्या सुमारास रहाटणी रोडवरील अंबिका कॉम्प्लेक्समधील शॉप नं. ०६ येथील ‘सुविधा स्पा’ येथे करण्यात आली. या प्रकरणी मंगळवारी (ता. २६ मे) काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार संतोष सूर्यकांत म्हस्के (वय ४३), अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अजित गोरक घोळप (वय ३७, सध्या रा. फ्लॅट नं. २०३, जांभुळकर बिल्डिंग, आदर्शनगर, हिंजवडी; मूळ रा. नागेश्वरनगर, चौधरवाडी, फलटण, सातारा) याने स्पा सेंटरच्या नावाखाली पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतल्याचे उघड झाले आहे. सदर स्पा सेंटरच्या परिसरात हॉस्पिटल (१० मीटर अंतरावर) तसेच दवाखाना अशी सार्वजनिक ठिकाणे असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. सार्वजनिक ठिकाणांच्या जवळअसूनही येथे अवैध धंदा सुरु असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३(३) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोउपनि मेटे करीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
- immoral trafficking, crime branch, anti human trafficking cell
- Pimpri Chinchwad, prostitution racket, police raid, arrested accused,
- Suvidha Spa, Ambika Complex, Rahatani Road,
- अनैतिक मानवी वाहतूक, गुन्हा दाखल, पिंपरी चिंचवड, काळेवाडी पोलीस ठाणे,
- काळेवाडी, स्पा सेंटर, छापा, वेश्या व्यवसाय, अटक, पोलिस कारवाई,