देहूरोड केंद्रीय आयुध भांडार येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी
देहूरोड केंद्रीय आयुध भांडार येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी
पिंपरी, ता. १८ - देहूरोड केंद्रीय आयुध भांडार (COD) येथे नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचाी संयुक्त जयंती दिमाखात साजरी करण्यात आली. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातून ढोल-ताशांच्या गजरात मशाल मिरवणूकीस सुरवात झाली. पुढे, बुद्ध विहार आणि मालवाडी मार्गे आयुध भांडारापर्यंत मिरवणूक काढली. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
केंद्रीय आयुध भांडारांच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्थापित छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भक्ती स्मारकास डेपोचे कमांडंट ब्रिगेडियर विकांत गंभीर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कर्नल अखिलेश कुमार व मेजर कनिका सिंग तसेच सैन्य दलाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर, 'छत्रपती शिवाजी महाराज मोटिव्हेशनल हॉल'मध्ये मुख्य कार्यक्रम झाला. येथे महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करण्यात आले.
वर्क्स कमिटी सेक्रेटरी प्रमोद मलगेकर व्हाईस चेअरमन विक्रम टकले व सर्व संघटनेचे जनरल सेक्रेटरी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर विकांत गंभीर, कर्नल अखिलेश कुमार व प्रा. प्रदीप कदम यांचे स्वागत केले. प्रा. प्रदीप कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.
केंद्रीय आयुध भांडाराचे कमांडंट ब्रिगेडियर विकांत गंभीर यांनी सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या. "महापुरुषांनी देशाला दिलेल्या योगदानाचा आपण कधीही विसर पडू देऊ नये. या महापुरुषांच्या विचारांचे आचरण करणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल." असे ते म्हणाले. केंद्रीय आयुध भांडाराच्या प्रशासनाने व डेपो वर्क्स कमिटीने संयोजन केले, अशी माहिती संजय डुमडे यांनी दिली.