दारु पिण्यासाठी ५०० रुपये न दिल्याने युवकास  मारहाण,  तीन आरोपी अटक

दारु पिण्यासाठी ५०० रुपये न दिल्याने युवकास मारहाण, तीन आरोपी अटक

दारु पिण्यासाठी ५०० रुपये न दिल्याने युवकास  मारहाण,  तीन आरोपी अटक

दापोडी, ता.18 - दारू पिण्यासाठी पाचशे रुपये न दिल्याने 21 वर्षे युवकाला शिवीगाळ करत विटेने व सिमेंटच्या तुकड्यांनी मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (या. 17) रामनगर, बोपखेल येथील गणेश मंदिराजवळ घडली आहे.

मारहाण झालेला अविनाश सुनिल गायकवाड (वय २१, कॅन्टिन मदतनीस) याने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार उर्फ भैय्या प्रकाश (वय २३), शेखर कांबळे (वय २६) आणि करण उर्फ बबलु कांबळे (वय २२) यांनी रात्री ११:४० वाजता फिर्यादी अविनाशच्या जवळ येऊन त्याच्याकडून ५०० रुपये दारु पिण्यासाठी मागितले. फिर्यादीने पैसे दिल्यानंतरही आरोपींनी पुन्हा ५०० रुपये मागितले. पैसे न दिल्यामुळे आरोपींनी अविनाशला  शिवीगाळ करत विटे व सिमेंटच्या तुकड्यांनी मारहाण केली. त्याच्या डोक्यावर आणि पायावर,  उजव्या पायाच्या अंगठ्यावर आणि पाठीत मारहाण केली. यात अविनाश जखमी झाला.

या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२), ११८(१), ११५ (२), १२५ (अ), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories