news
clock
दिघीत पाणीपुरीच्या पैशावरून तरुणास बेदम मारहाण

दिघीत पाणीपुरीच्या पैशावरून तरुणास बेदम मारहाण

दिघीत पाणीपुरीच्या पैशावरून तरुणास बेदम मारहाण

पिंपरी, ता. ४ -  पाणीपुरीचे पैसे दिले नसल्याच्या कारणावरुन चौघांनी एका २२ वर्षीय तरुणास बेदम मारहाण करुन त्याचा पाय फ्रॅक्चर केल्याची घटना मॅगझीन चौक परिसरातील दत्तनगर येथे घडली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोहम संदीप दळवी (वय २२, रा. आदर्शनगर, सुरत साडी सेंटर शेजारी, दिघी, पुणे) हे १ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मॅगझीन चौक येथील दत्तनगर परिसरात आईस्क्रीम खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाणीपुरी विक्रेत्याचे मागील महिन्याचे पैसे दिले नसल्याच्या कारणावरून आरोपी मनोज साखरे (पाटील), नितीन बुरुडे, गौरव शेवाळे आणि फैजन (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांनी त्यांच्याशी वाद घातला.

वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी सोहम दळवी यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डाव्या पायाच्या करंगळीच्या वरच्या भागाला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली.

याप्रकरणी ३ मार्च २०२६ रोजी दुपारी २.४७ वाजता दिघी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११७(२), ३(५) तसेच भारतीय दंड विधान कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories