पिंपरी-चिंचवड
वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या २६ वर्षीय युवतीवर गुन्हा
Mar 07 2026
58
वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या २६ वर्षीय युवतीवर गुन्हा
पिंपरी, ता. ७ - दिघी-भोसरी-आळंदी रस्त्यावर वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या २६ वर्षीय युवतीवर दिघी पोलिसांनी शुक्रवारी (ता. ६) दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दिघी-भोसरी-आळंदी रस्त्यावर मॅगझीन चौक परिसरात एक २६ वर्षीय युवती अश्लिल हावभाव करुन व अश्लिल शब्द उच्चारुन गैरवर्तन करत होती. त्यामुळे तेथून तेथे जाणायेणाऱ्या नागरीकांना अडथळ निर्माण होत होता तसेच सार्वजनिक सभ्यतेचा भंग होत होता.
या युवतीविरोधात दिघी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ (पिटा अॅक्ट) च्या कलम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला नोटीस बजावली आहे.