उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा निर्णय
Mar 07 2026
33
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा निर्णय
पिंपरी, ता. ६ - शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने कडक पाऊल उचलेले आहे. ते म्हणजे, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
नगराध्यक्ष संतोष दाभाडे व मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभाग प्रमुख अभिषेक शिंदे यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी (ता. ६) ही कारवाई सुरू करण्यात आली. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कचरा टाकू नये, तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शहर स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे. स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, सुनील काळकुटे, दत्तात्रय ढवळे, शहर समन्वयक शुभम चौकटे तसेच स्वच्छता पर्यवेक्षक राहुल आगळे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.