सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. २ - देहूफाटा परिसरात वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात दिघी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जूनला देहुफाटा परिसरात मोरे वडापावच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर एक महिला वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून, शब्दोउच्चार करत होती. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना लोकांना अडथळा होत होता व सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होत होता.
आरोपी महिलेवर दिघी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.