संत तुकारामनगरमध्ये ओल्ड मंक रम दारुच्या १६ सीलबंद बाटल्या जप्त

संत तुकारामनगरमध्ये ओल्ड मंक रम दारुच्या १६ सीलबंद बाटल्या जप्त

 संत तुकारामनगरमध्ये ओल्ड मंक रम दारुच्या १६ सीलबंद बाटल्या जप्त 

पिंपरी, ता. २ : संत तुकारामनगर परिसरात बिगरपरवाना दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर संत तुकारामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (ता.‌१) सायंकाळी सातच्या सुमारास सिल्वर ओक इमारतीजवळ, यशवंतराव चव्हाण रस्ता, संत तुकारामनगर येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्विन रमेश शेट्टी (वय ३८, रा. गंगा स्काय को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, वल्लभनगर, पिंपरी) हा त्याच्या ताब्यातील हुंडाई कंपनीच्या क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून बिगरपरवाना दारूची वाहतूक करताना आढळून आला. वाहनातून ओल्ड मंक रमच्या १६ सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारूची किंमत ३ हजार ४४० रुपये असून वाहनासह एकूण ९ लाख ३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई)(१)(२), ७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. फिर्याद पोलीस शिपाई वैभव दत्तात्रय सोन्ने यांनी दिली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories