news
clock

दिघी रस्त्यावर वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, नगरसेवक जालिंदर शिंदे यांची मागणी 

पिंपरी, ता. ९ - प्रभाग क्रमांक ५ भोसरी येथील दिघी रस्त्यावर सध्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी भोसरी पोलीस स्टेशन (वाहतूक विभाग) यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देत या ठिकाणी वाहतूक पोलीस व होमगार्ड तैनात करण्याची मागणी केली आहे.

जालिंदर शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, दिघी रोडवरील नूर मोहल्ला कॉर्नर परिसरात रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक पोलीस तसेच होमगार्ड यांची नियुक्ती करावी.

नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories