news
clock

'म्हाडा'च्या सुविधा आता डिजीटल स्वरुपात, 'डिजीम्हाडा' मोबाईल अॅप  विकसित 

पुणे, ता. ७ -  महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात 'म्हाडा'ने  'डिजीम्हाडा' मोबाईल अॅप  विकसित केले आहे. त्याद्वारे नागरीकांना म्हाडाच्या विविध गृहयोजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या अॅप्लिकेशनचे लोकार्पण 'म्हाडा'चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते 'म्हाडा'च्या मुख्य कार्यालयात करण्यात आले.

अॅप्लिकेशनच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना संजीव जयस्वाल म्हणाले, "नागरिक-केंद्रित प्रशासन ही काळाची गरज आहे. डिजीम्हाडा अॅपच्या माध्यमातून म्हाडा आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.  म्हाडाची ही डिजिटल क्रांती लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे. यामुळे प्रशासकीय कामकाजातील विलंब कमी होईल आणि एजंटांच्या माध्यमातून होणारी दिशाभूलही थांबण्यास मदत होईल.'' 

''डिजीम्हाडा अॅपद्वारे लाभार्थ्यांना घरांच्या लॉटरीपासून ते तक्रार निवारणापर्यंतच्या अनेक सेवा सहजपणे वापरता येणार आहेत. म्हाडाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे, आवश्यक फॉर्म आणि अर्ज डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. हे अॅप माहितीच्या अधिकाराच्या (RTI) तत्त्वांनुसार पारदर्शकतेला प्रोत्साहन देणारे आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅप सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. या सेवेशी जोडण्यासाठी नागरिकांनी ९३२६२५८९११ या क्रमांकावर कॉल करून नोंदणी करु  शकतात. डिजीम्हाडा अॅप्लिकेशनद्वारे गृहनिर्माण योजनांशी संबंधित संपूर्ण प्रक्रिया आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या अॅपमध्ये सुरक्षित लॉगिन प्रणाली वापरण्यात आली असून मोबाईल नंबर आणि ओटीपीच्या आधारे नोंदणी करावी लागते. त्यामुळे नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवली जाणार. '' असे जयस्वाल यांनी सांगितले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories