news
clock
दिव्यांगांना व्यवसायासाठी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरची योजना कागदावरच....

दिव्यांगांना व्यवसायासाठी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरची योजना कागदावरच....

दिव्यांगांना व्यवसायासाठी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरची योजना कागदावरच.... 

संतप्त दिव्यांग बंधू-भगिनींचे दिव्यांग भवनामध्ये ठिय्या आंदोलन, दहा दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन

पिंपरी, ता. २ - पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर देण्याची योजना जाहीर केली मात्र या योजनेची कार्यवाही अद्यापपर्यंत केलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या दिव्यांग बंधू-भगिनींनी बुधवारी (ता. १) दिव्यांग भवनातील दिव्यांग कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले.   

दिव्यांग बंधू-भगिनींनी सांगितले की, महापालिकेने शहरातील दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर देण्याची योजना जाहीर केली, लाभार्थींची पात्रताही निश्चित केली, अर्ज मागवले. मात्र, पुढे कार्यवाही केली नाही. प्रत्यक्ष एकही वाहन मिळालेले नाही. 

आंदोलकांनी सहायक आयुक्त निवेदिता घार्गे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पुढील दहा दिवसांत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आंदोलक राजेंद्र वाघचौरे म्हणाले, ''घार्गे यांनी याबाबत अजून फाईल तयार नसल्याचे सांगितले. त्यावर, आंदोलकांनी तीन महिने उलटले तरीही अजूनही फाईलच तयार नाही याबाबत नाराजीने विचारणा कली असता. त्यावर घार्गे यांनी उत्तर देण्याचे टाळले.'' वाघचौरे यांच्यासह रामचंद्र तांबे, लता दुराफे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories