रेल्वे अपघात टाळण्यासाठी देशभरातील 'डबल डायमंड क्रॉसिंग' हटविण्याचा निर्णय
पुणे, ता. १९ - मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचा पुणे स्थानकाच्या यार्डात २७ एप्रिलला चाक घसरुन अपघात झाला. असा अपघात पुन्हा होऊ नये यासाठी पुण्यासह देशभरातील 'डबल डायमंड क्रॉसिंग' हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'डबल डायमंड क्रॉसिंग' हटविण्याच्या निर्णयानुसार, रेल्वे प्रशासनाने हे जुने क्रॉसिंग बदलून त्याजागी नवीन अत्याधुनिक आरेखनाचे क्रॉसिंग टाकण्याचे काम हाती घेतले आहे. पुणे स्थानकाच्या दोन्ही यार्डामधील सुमारे ११ जुने क्रॉसिंग हटविले जाणार असून, त्यापैकी चार नवीन आरेखन असलेले क्रॉसिंग पुण्यात दाखल झाले आहेत. लवकरच या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
रुळांमध्ये मार्गिका एकमेकांना तिरप्या रेषेत छेदतात, तिथे हिऱ्यासारखा (डायमंड) आकार तयार होतो, त्याला 'डायमंड क्रॉसिंग' म्हणतात. मर्यादित जागेत गाड्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वळवण्यासाठी आणि दिशा बदलण्यासाठी डायमंड क्रॉसिंगचा वापर केला जातो. यात अनेक तांत्रिक गोष्टी एकाच वेळी सक्रिय असल्याने थोडीही चूक झाली तरी डबे रुळावरून घसरण्याची शक्यता असते.
याबाबत, बोलताना पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा म्हणाले की, '''डबल डायमंड क्रॉसिंग' हटविण्याचा निर्णय राष्ट्रीय स्तरावर झाला असून, त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.''
- अत्याधुनिक आरेखन, Modern Design, रेल्वे प्रशासन, Railway Administration, मार्गिका, Rails, हिऱ्यासारखा आकार, Diamond Shape, दिशा बदलणे, Switch Tracks,
- यार्ड, Yard, चाक घसरणे, Wheel Slip, सुरक्षितता, Safety, नवीन क्रॉसिंग, New Crossing,
- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, Mumbai-Solapur Vande Bharat Express,
- , Removal Decision, पुणे, Pune
- रेल्वे अपघात, Railway Accident, डबल डायमंड क्रॉसिंग, Double Diamond Crossing,