रॉक मेट इव्हेंट्स आयोजित 'फॅशन शो'चे विजेते ठरले प्रिया कुमारी आणि अमन गिल
पिंपरी, ता. १९ - रॉक मेट इव्हेंट्स यांच्या वतीने नुकताच 'भव्य रॉक मेट फॅशन सप्ताह' कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा दिमाखदार फॅशन शो तारांगण बँक्वेट, प्राधिकरण, चिंचवड, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये एकूण १४ स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या कला, आत्मविश्वास आणि शैलीचा अप्रतिम आविष्कार सादर केला. प्रिया कुमारी यांनी 'मिस रॉकमेट' आणि अमन गिल यांनी 'मिस्टर रॉकमेट' किताब पटकावला
अभिनेता व दिग्दर्शक प्रकाश धिंडले, बँड सल्लागार व लेखक जयंत शिंदे, आगामी आऊट ऑफ सिलेबस चित्रपटातील अभिनेत्री अद्वयी,कन्नड चित्रपट अभिनेत्री भूमिका थम्मेगौडा, रॉक मेटचे संचालक अतुल एस. इगवे, संयोजिका अर्चना पाटील तौंदकर, सीमा इगवे आणि आशुतोष तौंदकर यांची प्रमुख उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा तौंदकर मोरे यांनी केले.
विजेत्या स्पर्धकांची नावे -
मिस रॉक मेट – प्रिया कुमारी
मिस्टर रॉक मेट – अमन गिल
मिस रॉक मेट प्रथम उपविजेती – सृष्टी पलांडे
मिस रॉक मेट द्वितीय उपविजेती – ऋतुजा शेवाळे
मिस्टर रॉक मेट प्रथम उपविजेता – प्रतीक ताटे
मिस्टर रॉक मेट द्वितीय उपविजेता – शरद कदम