news
clock
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या शहरात विविध ठिकाणी वाहतूकीत बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या शहरात विविध ठिकाणी वाहतूकीत बदल

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या शहरात विविध ठिकाणी वाहतूकीत बदल 

पिंपरी, ता. १३ - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १४) शहरात अनेक ठिकाणी मिरवणूकांचे आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी या मिरवणूकांमध्ये सहभागी होतात. या सर्व मिरवणुका सुरळीतपणे पार पडाव्यात व वाहतूक कोंडीही होऊ नये, यासाठी शहरात विविध ठिकाणी वाहतूकीच्या मार्गांत बदल करण्यात आला आहे. मिरवणुकीतील हा बदल मंगळवारी दुपारी १२ ते रात्री १० यावेळेत लागू असणार आहे, याबाबतचे आदेश वाहतूक विभागाने जारी केले आहेत.   नागरीकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन वाहतूक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. 

असे आहेत वाहतूकीतील बदल - 

- चिंचवडमधील लोकमान्य रुग्णालय चौकाकडून महावीर चौकाकडे वाहतूक बंद 

पर्यायी मार्ग - लोकमान्य रुग्णालय चौकापासून डावीकडे वळून दळवीनगर तसेच महावीर चौकातून डावीकडून वळून


- रिव्हर व्हयू चौकाकडून महावीर चौकाकडे वाहतूक बंद

पर्यायी मार्ग - चिंचवड फार्म मार्गाने वाल्हेकरवाडी, रावेतमार्गे मुंबईकडे जातील तसेच भोसरीकडे जाणारी वाहने ही बिजलीनगर चौक, संभाजी चौक, भक्ती-शक्ती चौक मार्गे


- बसवेश्वर चौकाकडून महावीर चौकाकडे वाहतूक बंद 

पर्यायी मार्ग - केएसबी चौकाकडून येणारी वाहने सायन्स पार्कमार्गे 


- महावीर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे सेवा रस्त्याने येण्यास मनाई

पर्यायी मार्ग - डी मार्ट इनग्रेड सेपरेटर मार्गे, डी मार्ट पंक्चर येथून डाव्या बाजूने ऑटो क्लस्टरमार्गे


- नाशिक फाट्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे वाहतूक बंद

पर्यायी मार्ग - डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एचपी पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर इन तसेच कृष्णा हॉटेल येथून डाव्या बाजूने वळून साई चौक


- नेहरूनगर चौकाकडून एच ए कॉर्नर (रहिवाशांच्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहने नेहरूनगर चौकातून वल्लभनगर तसेच नेहरूनगरमार्गे)

- रसरंग चौकाकडून एच ए कॉर्नर व पिंपरी चौक (रसरंग चौकाकडून येणारी वाहतूक एच ए कॉर्नर येथून डाव्या बाजूस वळून नेहरूनगर चौक)


- सम्राट चौकाकडून जयमल्हार खानावळी समोरुन मोरवाडी चौकाकडे वाहतूक बंद

पर्यायी मार्ग - रसरंग चौकाकडून येणारी वाहतूक सम्राट चौकातून उजव्या बाजूस वळून जुने मोरवाडी न्यायालयमार्गे


- पिंपरीतील महापालिका आऊटगेट येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे वाहतूक बंद

पर्यायी मार्ग - गांधीनगर कॉर्नरमार्गे एच ए कॉर्नर


- चिंचवड सायन्स पार्ककडून मोरवाडी चौकाकडे सेवा रस्त्याने येण्यास मनाई 

पर्यायी मार्ग - सायन्स पार्क /ऑटो क्लस्टरकडून येणारी वाहतूक जिजामाता चौक व मदर टेरेसा पुलावरुन


- क्रोमा शोरूमकडून गोकुळ हॉटेलकडे वाहतूक बंद 

पर्यायी मार्ग मोरवाडी चौकाकडून क्रोमा शोरुमकडे येणारी वाहने पिंपरी पूलमार्गे जातील


- दापोडीतील हॅरिस पूल ते फुगेवाडी चौक सेवा रस्ता बंद

पर्यायी मार्ग हॅरिस पुलावरून ग्रेड सेपरेटरमार्गे


- बोपोडी संविधान चौकाकडून दापोडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रस्ता बंद  

पर्यायी मार्ग - हॅरिस पूल दापोडीमार्गे


- शितळादेवी चौकाकडून दापोडीगाव रस्ता बंद

पर्यायी मार्ग - शितळादेवी चौकाकडून सांगवी मार्गे


- देहूरोडमधील शितळानगर येथील शिवाजी विद्यालय देहूरोड जामा मस्जिद स्वामी चौक वाहतूक बंद

पर्यायी मार्ग - देहूरोड गावातील अंतर्गत रस्त्याचा वापर


- गुरुद्वारा ते देहूरोड सुभाष चौक-भाजी मंडई-सवाना चौक रस्ता बंद

पर्यायी मार्ग - गावातील अंतर्गत रस्ते


- देहूरोड रेल्वे पूल सवाना चौकाकडे सेवा रस्ता बंद 

पर्यायी मार्ग - सेंट्रल चौकमार्गे तसेच अंतर्गत रस्ता


- गुरुद्वारासमोरील गावात जाणारा अंतर्गत मार्ग व पुलालगत गावात जाणारा सेवा रस्ता बंद 

पर्यायी मार्ग - गावातील अंतर्गत रस्ते


- देहूतील मुख्य कमान ते छत्रपती शिवाजी महाराज चौक-श्री संत तुकाराम महाराज मंदिर-चौदा टाळकरी कमान रस्ता बंद 

पर्यायी मार्ग - गावातील अंतर्गत रस्ते


- चाकण चौकाकडून महात्मा फुले चौक व नेहरु चौक रस्ता बंद

पर्यायी मार्ग - माणिक चौक- मेदनकरवाडी मार्गे, तळेगाव चौक-आंबेठाण चौकमार्गे


- आंबेठाण चौक बाजूकडून महात्मा फुले चौक वाहतूक बंद

पर्यायी मार्ग - चाकण तळेगाव चौकातून मेदनकरवाडी चौकमार्गे शिक्रापूर रस्ता


- मार्केट यार्ड चाकण बाजूकडून नेहरु चौक रस्ता बंद

पर्यायी मार्ग - आंबेठाण चौकमार्गे चाकण चौक


- नेहरु चौकाकडून शनी मंदिर रस्ता बंद 

पर्यायी मार्ग - आंबेठाण चौकमार्गे चाकण व बीड वस्तीमधून खंडोबा माळ चौकातून मेदनकरवाडीमार्गे


- दिघीतील मॅक्झिन चौक-बोपखेल फाटा मार्गे पुणे बाजूकडे वाहतूक बंद

पर्यायी मार्ग - मॅक्झिन चौक येथून उजवीकडे वळून भोसरीमार्गे, मॅक्झिन चौक येथून डावीकडे वळून अलंकापुरममार्गे


- मोशी येथे पुणे-नाशिक महामार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक मोशी येथे येण्यास मनाई 

पर्यायी मार्ग - भारतमाता चौक येथून


- वाय पॉइंट कुदळेवस्ती येथून अनुष्का सोसायटी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मोशी येथे येण्यास मनाई

पर्यायी मार्ग  - भारतमाता चौक येथून


- निगडीतील भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरून पिंपरीच्या दिशेने जाण्यास जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी

पर्यायी मार्ग - भक्ती शक्ती सर्कल-अंकुश चौक-त्रिवेणीनगर चौक, दुर्गानगर चौक-थरमॅक्स चौक-केएसबी चौक-भोसरी मार्गे


- रहाटणी फाटा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक रहाटणी गाव रस्ता बंद 

पर्यायी मार्ग - रहाटणी फाटा चौक बाजूकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक (रहाटणी गाव) बाजूकडे येणारी जाणारी वाहतूक काळेवाडी फाटामार्गे


- कुणाल हॉटेल ते नखाते वस्ती चौक बाजूकडे येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर प्रवेशास मनाई 

पर्यायी मार्ग - काळेवाडी फाटामार्गे


- महादेव मंदीर/पिंपळे सौदागर पोलिस चौकी ते रहाटणी फाटा रस्ता बंद 

पर्यायी मार्ग - महादेव मंदीर/पिंपळे सौदागर पोलिस चौकी येथून पी के चौकाकडून


- जीवनज्योती रुग्णालयजवळील टी पॉइंट ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक रहाटणी गाव रस्ता बंद 

पर्यायी मार्ग - जीवनज्योती रुग्णालय जवळील टी पॉइंट ते पी. के. चौक



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories