डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांची दुचाकी फेरी
पिंपरी, ता. १० - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्धजन विकास समितीच्या वतीने यंदा महिलांची दुचाकी रॅली आयोजित केली आहे. १४ एप्रिलला दुपारी दोन वाजता संत तुकाराम नगर येथील संत रोहिदास विचार मंच येथून महिला दुचाकी रॅलीला सुरुवात होणार आहे. रॅलीचा समारोप भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे होणार आहे. याशिवाय, ७ फेब्रुवारी ते १४ एप्रिलपर्यंत वही व पेन संकलन अभियान समितीच्या वतीने राबविण्यात येत आहे.
या सामाजिक उपक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले जाणार आहे. अधिकाधिक महिलांनी दुचाकी फेरीत सहभागी व्हावे. तसेच वही-पेन संकलन अभियानामध्ये सहभागी होऊन गरजू विद्यार्थ्यांसाठी आपलाही वाटा द्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.