आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या वक्तव्याचा  आमदार शंकर जगताप व अमित गोरखे यांच्याकडून  निषेध

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या वक्तव्याचा आमदार शंकर जगताप व अमित गोरखे यांच्याकडून निषेध

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या वक्तव्याचा  आमदार शंकर जगताप व अमित गोरखे यांच्याकडून  निषेध 

पिंपरी, ता. १ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (ता. ३०) पत्रकार परिषदेत पिंपरी-चिंचवड शहराबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा आमदार लक्ष्मण जगताप व आमदार अमित गोरखे यांनी निषेध केला आहे. 


''आयुक्तांनी शहराची ओळख शोधण्यापेक्षा महापालिकेच्या कारभारावर लक्ष केंद्रित करावे'' - आमदार शंकर जगताप 

आमदार जगताप यांनी म्हटले आहे की, ''पिंपरी-चिंचवड ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली अन् चापेकर बंधूंसारख्या क्रांतीकारकांच्या बलिदानाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे. अशा पवित्र भूमीबद्दल ‘जगात कोणी ओळखत नाही’ असे विधान करणे, म्हणजे या मातीचा आणि संस्कृतीचा अवमान आहे.   ज्या शहराने शून्यातून विश्व निर्माण करुन जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले, त्या शहराबद्दल अशी मुक्ताफळे उधळणे हा येथील नागरिक आणि भूमिपुत्रांच्या भावनांचा अपमान आहे.  प्रशासकीय प्रमुखाच्या खुर्चीवर बसून शहराच्या गौरवशाली इतिहासाची आणि प्रगतीची थट्टा करणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आयुक्तांच्या या विधानामुळे उद्योजक, तरुण पिढी आणि सामान्य पिंपरी-चिंचवडकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.''

''माझा आयुक्तांना सल्ला आहे की, त्यांनी शहराची ओळख शोधण्यापेक्षा महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर आणि प्रलंबित विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे. मोदीजी आणि फडणवीसजींच्या स्वप्नातील हे शहर स्वयंभू आहे. पिंपरी-चिंचवडची ओळख पुसण्याचा किंवा येथील भूमिपुत्रांच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असे आमदार शंकर जगताप यांनी म्हटले आहे.''


''आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जबाबदारीने विधाने करावीत'' - आमदार अमित गोरखे 

आमदार अमित गोरखे यांनी म्हटले आहे की, ''महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, बेजबाबदार आणि शहराच्या अस्मितेला धक्का देणारे आहे. पिंपरी चिंचवड हे शहर जागतिक स्तरावर औद्योगिक प्रगतीसाठी ओळखले जाते. टाटा मोटर्स, मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन, बजाज ऑटो यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या उद्योगसंस्था येथे कार्यरत असून, देशाच्या आर्थिक विकासात मोठे योगदान देत आहेत. इतकेच नव्हे तर, पिंपरी चिंचवड हे संतांची परंपरा आणि सामाजिक चळवळींचे केंद्र राहिले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील सर्वात सक्षम आणि सक्षम प्रशासन देणाऱ्या महानगरपालिकांपैकी एक मानली जाते. स्मार्ट सिटी, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीमुळे या शहराने राष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत आयुक्तांनी केलेले वक्तव्य हे शहराच्या प्रगतीकडे आणि नागरिकांच्या कष्टांकडे दुर्लक्ष करणारे आहे. ''

''आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी-चिंचवडच्या गौरवशाली इतिहासाचा आणि औद्योगिक प्रगतीचा गांभीर्याने अभ्यास करावा, त्यानंतरच जबाबदारीने विधाने करावीत. शहराची जागतिक ओळख ही कष्टाने निर्माण झाली असून, अशा प्रकारची अनाठायी वक्तव्ये करणे अत्यंत दुर्दैवी आहे. पिंपरी-चिंचवडची ओळख जगभर आहे आणि ती अधिक भक्कम करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे.''





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories