पत्रकार महिलेवर अर्वाच्य भाषेत टिप्पणी केल्याने रिलस्टार संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पत्रकार महिलेवर अर्वाच्य भाषेत टिप्पणी केल्याने रिलस्टार संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पत्रकार महिलेवर अर्वाच्य भाषेत टिप्पणी केल्याने रिलस्टार संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणे, ता. १ - सामाजिक प्रश्नांबाबत रिल्समधून आवाज उठवणाऱ्या पुण्यातील संतोष पंडित यांच्या रिल्स आपण पाहतो. संतोष पंडित यांच्यावर पत्रकार महिलेला अर्वाच्य भाषेत बोलल्यामुळे, कपड्यांवरुन अश्लील टिप्पणी केल्यामुळे तसेच तिच्या इच्छेविरुद्ध मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्यामुळे पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील टिळक रस्त्यावर सोमवारी (ता.३०) भोंदू खरात विरोधातील आंदोलनाचे वार्तांकन सुरु असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणाचा निषेध करण्यासाठी टिळक रस्त्यावर महिलांकडून आंदोलन करण्यात आले. 

यावेळी संतोष पंडित तेथे आले आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होतेय असे त्यांचे म्हणणे होते. पंडित यांनी आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराबाबत अर्वाच्च्य भाषा वापरली. संबंधित पत्रकार महिलेने घातलेल्या कपड्यांवरुन अश्लील टिप्पणी केली. तिच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्या मोबाईलमध्ये तिचे चित्रीकरण केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.  

याप्रकरणी संबंधित महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून पर्वती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७५, ७८, ३५२, ३५१(१) आणि २९६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरु आहे.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories