news
clock
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे पाणी व अल्पोपहार वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे पाणी व अल्पोपहार वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे पाणी व अल्पोपहार वाटप

पिंपरी, ता. १४ -  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ व्या जयंती पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साहात साजरी होत आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो नागरीक पिंपरी येथील भीमसृष्टी येथे आले होते. त्यांच्यासाठी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने पाणी व अल्पोपहार वाटपाचा उपक्रम राबवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करुन उपक्रमाची सुरवात झाली.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम घेण्यात आला. उपस्थित पत्रकारांनी अनुयायांच्या सेवेत खारीचा वाटा दिला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे शहर अध्यक्ष विनय सोनवणे यांनी या उपक्रमाच्या आयोजनामध्ये मोलाचे योगदान दिले.

या उपक्रमात आमदार शंकर जगताप, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शिवसेना नेते युवराज कोकाटे, कैलास कुटे, दीपक नागरगोजे यांच्यासह विविध पक्ष, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. 

यावेळी आयोजक पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी, डिजिटल मीडिया परिषद अध्यक्ष विनय सोनवणे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे यांच्यासह पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषद पिंपरी चिंचवडचे सदस्य व पदाधिकारी, पत्रकार महावीर जाधव, सिद्धांत चौधरी, संतोष गोतावळे, संभाजी बारबोले, रोहित जाधव, अशोक कोकणे, दत्ता कांबळे, नरेश जीवनाल, हनुमंत रामदासी, सीता जगताप उपस्थित होते.  विविध संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories