डॉ. प्रीती रानवडे-शिरसाळकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 'कॅन्सर बायोलॉजी' विषयात पीएचडी प्रदान
डॉ. प्रीती रानवडे-शिरसाळकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 'कॅन्सर बायोलॉजी' विषयात पीएचडी प्रदान
पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने डॉ. प्रीती रानवडे - शिरसाळकर यांना "कॅन्सर बायोलॉजी" (Cancer Biology) या अत्यंत संवेदनशील आणि संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विषयात पीएचडी (PhD)पदवी सोमवारी (ता. १०) प्रदान करण्यात आली आहे.
आजच्या काळात कर्करोग (Cancer) हा वैद्यकीय क्षेत्रापुढील एक अत्यंत मोठा आणि आव्हानात्मक आजार ठरला आहे. या विकारावर मात करण्यासाठी आणि त्यावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. डॉ. प्रीती रानवडे - शिरसाळकर यांनी कॅन्सर बायोलॉजी या अत्यंत गुंतागुंतीच्या विषयावर गांभीर्याने संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे कर्करोगाच्या गाठींची वाढ, पेशींचे वर्तन आणि त्यावरील उपचारांच्या नवीन दिशा समजून घेण्यास मोठी मदत मिळणार असून, भविष्यात वैद्यकीय संशोधनासाठी हा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
डॉ. प्रीती रानवडे - शिरसाळकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, प्राध्यापकांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील संशोधन व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.