थेरगावात मोकळ्या जागेत भराव टाकल्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल, महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाची तक्रार
थेरगावात मोकळ्या जागेत भराव टाकल्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल, महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाची तक्रार
पिंपरी, ता. २ - जगतापनगर-थेरगाव येथे मोकळया जागेमध्ये भराव टाकल्याने तेथील नाला अरुंद झाला आहे. या प्रकरणी दोन जणांवर बुधवारी (ता. १) काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भराव टाकण्याचा हा प्रकार जून २०२५ पासून आत्तापर्यंत सुरु होता.
याबाबत, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता पंकज घेडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, थेरगाव गावठाणातील शुभम ओव्हाळ व सारिका जगताप यांच्याविरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९९४ चेकलम २२९,३३०,३७६ व पर्यावरण संवर्धन अधिनियम १९८६ चेकमल १५, तसेच भारतीय न्यायसंहिता कलम ३२६ (सी) ३ (५) अन्वये भा.द.वि. ४३२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना जगतापनगर-थेरगाव येथील मोकळया जागेमध्ये अनधिकृत भराव टाकणे बंद करण्याबाबत नोटीस बजावली होती. तरीही त्यांनी त्यांनी भरावाचे काम थांबविले नाही. कालांतराने नाल्यामध्ये माती साचून नाला अरुंद झाला आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९९४, Maharashtra Municipal Corporation Act 1994,
- पर्यावरण संवर्धन अधिनियम १९८६, Environment Protection Act 1986,
- पर्यावरण प्रदूषण, environmental pollution,
- नाला अतिक्रमण, drainage encroachment,
- बेकायदेशीर भराव, illegal dumping,
- जगतापनगर, Jagtap Nagar,
- थेरगाव, Thergaon,