गांजा बाळगणाऱ्या युवकाला संत तुकारामनगरमध्ये अटक
पिंपरी, ता. २ - संत तुकारामनगर-पिंपरी येथील एच. ए. मैदान परिसरात एकूण १४, हजार ६००/- रुपयांचा २९२ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी २२ वर्षीय युवकाकडून जप्त केला. आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (ता. १) करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश प्रेमबहादुर परीहार (वय २२ वर्षे, रा. नेहरुनगर,पिंपरी) याने एकूण १४,६००/- रुपये किंमतीचा २९२ ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशिररित्या विक्रीसाठी बाळगला होता. आरोपी मूळचा नेपाळचा आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपीविरोधात संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १) एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), ? (pi)(ii)(3pi) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.