news
clock
किरकोळ कारणावरुन दुकानदाराला मारहाण व कोयत्याने वार, चिंचवडमधील घटना

किरकोळ कारणावरुन दुकानदाराला मारहाण व कोयत्याने वार, चिंचवडमधील घटना

किरकोळ कारणावरुन दुकानदाराला मारहाण व कोयत्याने वार, चिंचवडमधील घटना 

पिंपरी, ता. ३ - किरकोळ कारणावरुन तिघांनी एका किराणा दुकानदाराला मारहाण केली व कोयत्याने वार करुन त्या दुकानदार तरुणाला जखमी केले. ही घटना गरुवारी (ता. २) रात्री पत्रा शेड-लिंक रोड-चिंचवड येथे घडली. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत, संबंधित किराणा दुकानदार विकास अरुण झिंजाडे (वय ३२ वर्षे, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.  आरोपी उदल उर्फ चिकन्या हरिचंद वाल्मिकी (वय ४० वर्षे), आदित्य उर्फ लाल्या किसन जाधव (वय ३२ वर्षे) व अजित उर्फ मद्री रामा पवार (वय ३२ वर्षे) या तिघांवर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघे आरोपी लिंक रोड पत्रा शेड येथील रहिवासी आहेत. 

आरोपींनी फिर्यादी विकास झिंजाडे यांच्याकडे सिगारेट मागितली. त्यावर झिंजाडे यांनी दुकानाची चावी नाही असे सांगितले असता आरोपी चिडले. त्यांनी झिंजाडे यांना शिवीगाळ व हाताने मारहाण केली. एकाने त्याच्याकडील लोखंडी कोयत्याने झिंजाडे यांच्या पाठीवर वार केले, त्यात झिंजाडे जखमी झाले. 

आरोपीं विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन २०२३ च्या कलम ११८(२),११५ (२), ३५२,३ (५), भारतीय हत्यार कायदा सन १९५९ च्या कलम ४ (२५) (२७), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७ (१) (३) सह कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories