शेअर मार्केट जास्त नफ्याच्या आमिषाने महिलेची २० लाख ५८ हजारांची फसवणूक
पिंपरी, ता. ३ - शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन एका इसमाने महिलेची २० लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गुरुवारी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२१ पासून ते सन २०२६ या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. आरोपी विवेक जगदेवराव शिंदे याने फिर्यादीला डिमॅट अकाऊंट उघडण्यास सांगितले आणि त्यामध्ये गुंतवणूक करून होणारा फायदा वेळेत देण्याचे खोटे आश्वासन दिले.
फिर्यादीचा विश्वास संपादन करुन आरोपीने वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमांमधून पैसे घेऊन हा मोठा गंडा घातला. आरोपीला अटक झालेली नाही. पोलीसांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता - २०२३ च्या कलम ३१६ (१), ३१८(२) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.