मद्यधुंद पतीची पत्नीला मारहाण, सांडशी डोक्यात घातली, तळेगाव दाभाडे येथील घटना
Apr 09 2026
47
मद्यधुंद पतीची पत्नीला मारहाण, सांडशी डोक्यात घातली
पिंपरी, ता. ९ - मद्यधुंद पतीने पत्नीला विनाकाराण लाथाबुक्क्यांनी मारहाण केल, सांडशी पत्नीच्या डोक्यात घालून तिला जखमी केले. ही घटना तळेगाव दाभाडे येथे बुधवारी (ता. ८) घडली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ८) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मंत्रा सिटी गृहप्रकल्पात संबंधित महिला घरी असताना तिचा पती संजय हिरामण पाटील (वय ५०) हे दारुच्या नशेत घरी आला. यावेळी कोणतेही कारण नसताना त्यांनी पत्नीला शिवीगाळ करत हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पत्नीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, पतीने स्वयंपाकघरातील सांडशी उचलून तिच्या डोक्यात घालून पत्नीला जखमी केले. पतीला अटक झालेली नाही.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बुधवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.