बस थांब्यांवरील अनधिकृत होर्डिंग्ज त्वरीत काढावीत, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू भालेराव यांची मागणी
Apr 09 2026
55
बस थांब्यांवरील अनधिकृत होर्डिंग्ज त्वरीत काढावीत, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू भालेराव यांची मागणी
पिंपरी, ता. ९ - शहरातील बीआरटी बसथांब्यावरील अनधिकृत होर्डिंगवर दंडात्मक कारवाई करुन ती त्वरीत काढण्यात यावीत, अशी मागणी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू भालेराव यांनी केली. याबाबतचे निवेदन महापालिकाआयुक्तांना दिले आहे.
भालेराव यांनी म्हटले आहे की, बसथांब्यावरील जाहिरातीचे होर्डिंग्ज हे पुणे महानगर परिवहन महामंडळच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशाने रद्द केलेले आहेत. बीआरटीएस मार्गावर १५ जुलै २०२५ पासून आजपर्यंत अनधिकृत जाहिराती लावल्या जात असून, त्यावर आकाशचिन्ह व परवाना
विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. ज्या कालावधीत परवानगी दिली होती, ती मुदत संपल्याने ते अनधिकृत होर्डिंग काढण्याचा पूर्ण अधिकार आपल्या महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाला आहे तरीही कारवाई का केली जात नाही, असा सवाल भालेराव यांनी उपस्थित केला आहे. या अनधिकृत होर्डिंग्जमुळे बस थांब्यांचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगवर दंडात्मक कारवाई करुन ती त्वरितकाढावीत असे भालेराव यांनी म्हटले आहे.