डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एमसीए अॅण्ड मॅनेजमेंट'मध्ये 'अत्याधुनिक संशोधन व नवोपक्रम' विषयावर चर्चासत्र

पिंपरी, ता. १ - आकुर्डी येथील 'डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एमसीए अॅण्ड मॅनेजमेंट'मध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आकुर्डीत आयोजित 'अत्याधुनिक संशोधन व नवोपक्रम' या विषयावरील चर्चासत्र झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम झाला.

चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी संकुलाचे संचालक रिअर अॅडमिरल (निवृत्त) अमित विक्रम, डॉ. राजेश एन. पहूरकर, डॉ सच्चिदानंद आर. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. मुख्य वक्ते डॉ. तथागत मुखर्जी यांनी 'भक्कम संशोधन पायाभूत रचना उभारणे' या विषयावर मार्गदर्शन केले. 

दुसऱ्या दिवशी डॉ. सम्राट रे यांनी 'बिल्डिंग इनोव्हेशन माइंड-सेट फॉर अकॅडेमिशियन्स' या विषयावर सत्र घेतले. डॉ. रमेश मांझा यांनी 'इकोसिस्टम्स थ्रू केस स्टडीज' या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. कविता सूर्यवंशी यांनी 'क्वालिटी रिसर्च पब्लिकेशन्स' तर डॉ. परिक्षित महाले यांनी 'आयपीआर अवेअरनेस' विषयावर माहिती दिली. 

 संस्थेच्या संचालक डॉ. के. निर्मला यांचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्या डॉ. कविता सूर्यवंशी यांनी संयोजन केले. डॉ. गोरख वाखरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories