लाडकी बहिण योजनेच्या लाभ बंद झालेल्या लाभार्थींना 'केवायसी'साठी ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदतवाढ
Apr 01 2026
52
लाडकी बहिण योजनेच्या लाभ बंद झालेल्या लाभार्थींना 'केवायसी'साठी ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदतवाढ
पुणे, ता. १ - लाडकी बहिण योजनेच्या ज्या लाभार्थींचा लाभ तांत्रिक अडचणींमुळे बंद झाला आहे, त्यांच्यासाठी 'केवायसी'साठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी (ता. १) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने सांगितले आहे की, योजनेचा लाभ घेताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित किंवा कायम कर्मचारी अथवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असतील; किंवा सरकारी उपक्रम, मंडळ, भारत सरकार अथवा राज्य सरकराच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील तर त्याला लाभ मिळत नाही.
३१ डिसेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी करताना अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला होता. त्यामुळे सरकारने पुन्हा या महिलांसाठी साधारण दोन महिन्यांचा अवधी उपलब्ध करुन होता. ती मुदत वाढवून ३१ मार्चपर्यंत करण्यात आलेली होती. नेमका असाच पर्याय काही लाभार्थी महिलांनी नजरचुकीने निवडल्याने त्यांचा लाभ बंद झाला होता. त्यामुळे सरकारने पुन्हा या महिलांसाठी साधारण दोन महिन्यांचा अवधी उपलब्ध करुन होता. ती मुदत वाढवून ३१ मार्चपर्यंत करण्यात आलेली होती.