बीआरटी बस थांब्यावर तरुणीची छेडछाड विकृत तरुणाला अटक, शंभराहून अधिक सीसीटीव्ही तपासून पोलिसांची कारवाई
बीआरटी बस थांब्यावर तरुणीची छेडछाड विकृत तरुणाला अटक, शंभराहून अधिक सीसीटीव्ही तपासून पोलिसांची कारवाई
पिंपरी, ता. २५ - चिंचवडमधील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर एका २४ वर्षीय तरुणीची अश्लील हावभाव करत छेडछाड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी जाखिर हमीद शेख याला वाल्हेकरवाडीतून अटक केली आहे.
शुक्रवारी, २२ मे रोजी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास ही तरुणी कंपनीच्या बसची वाट पाहत उभी होती. त्यावेळी आरोपीने तिच्यासमोर अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. तरुणीने न घाबरता धाडस दाखवून मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरु केले. यामुळे घाबरलेला आरोपी आपली ओळख लपवण्यासाठी अंगातील जॅकेट आणि टोपी रस्त्यावर फेकून पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी जाखिर शेखचा माग काढत त्याला वाल्हेकरवाडीतून बेड्या ठोकल्या. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- सीसीटीव्ही तपासणी, CCTV Investigation, आरोपी अटक, Accused Arrested, जाखिर हमीद शेख, Zakir Hamid Sheikh,
- , छेडछाड गुन्हा, Harassment Case, तरुणी सुरक्षितता, Women Safety, सार्वजनिक ठिकाणी छेडछाड, Public Place Harassment,
- एम्पायर इस्टेट बीआरटी थांबा, Empire Estate BRT Stop,
- मदर तेरेसा उड्डाणपूल, Mother Teresa Flyover,
- बीआरटी बसथांबा छेडछाड प्रकरण, BRT Bus Stop Harassment Case