बँक खात्यांचा ऑनलाइन अॅक्सेस मिळवून नोकरदाराची 1.03 लाखांची फसवणूक; राजस्थानमधून 2 आरोपी निष्पन्न

बँक खात्यांचा ऑनलाइन अॅक्सेस मिळवून नोकरदाराची 1.03 लाखांची फसवणूक; राजस्थानमधून 2 आरोपी निष्पन्न

नोकरदाराच्या 2 बँक खात्यांचा संमतीविना ऑनलाइन अॅक्सेस मिळवून एकूण 1 लाख 3 हजार 582 रुपये परस्पर हस्तांतरित करत आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाच्या तपासात राजस्थानमधील 2 आरोपी निष्पन्न झाले असून, पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे.

किशोर गणपत सूर्यवंशी (वय 25, व्यवसाय—खासगी नोकरी, रा. इंडस इंटरनॅशनल स्कूल, भुकूम, ता. मुळशी, जि. पुणे; मूळ रा. सावळदबारा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून अमर वैजनाथ वाघमारे आणि पूर्ण नाव व पत्ता माहीत नसलेल्या मनीषकुमारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान अशोककुमार निंबाराम जाखड (वय 25, रा. धनारी कला, जोधपूर, राजस्थान) आणि अर्जुन हिरामन अहलावत (वय 21, रा. बठाड, जोधपूर, राजस्थान) हे आरोपी निष्पन्न झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या खोलीमध्ये असताना त्यांच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यातून 93 हजार रुपये अमर वैजनाथ वाघमारे याच्या खात्यावर हस्तांतरित झाल्याचा संदेश मोबाइलवर आला. या व्यवहाराचा UTR क्रमांक 128346357329 असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर फिर्यादीच्या HDFC बँक खात्यातून 10 हजार 582 रुपये मनीषकुमारच्या खात्यावर हस्तांतरित झाल्याचा आणखी एक संदेश प्राप्त झाला. या व्यवहाराचा UTR क्रमांक 436411763177 असल्याचे सांगण्यात आले आहे.

फिर्यादीने कोणालाही पैसे हस्तांतरित केले नसल्याने त्यांनी बँक खात्यांची माहिती तपासली. अज्ञात आरोपींनी दोन्ही खात्यांचा ऑनलाइन अॅक्सेस मिळवून फिर्यादीच्या परवानगीशिवाय एकूण 1 लाख 3 हजार 582 रुपये काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 398/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांनुसार पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories