news
clock
ड क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांचे आंदोलन

ड क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांचे आंदोलन

ड क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांचे आंदोलन

पिंपरी, ता. १८ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईच्या निषेधार्थ नॅशनल हॉकर्स फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने रहाटणी-काळेवाडी येथील 'ड' क्षेत्रीय कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. १७) आंदोलन केले. महापालिका चुकीच्या पद्धतीने कारवाई करुन फेरीवाल्यांचे नुकसान करत आहे, हे आंदोलकांनी सांगितले. महापालिकेने फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी न केल्यास पुढील काळात बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा फेरीवाला क्रांती महासंघाचे प्रमुख काशिनाथ नखाते यांनी दिला आहे. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभारी अधिकारी पूजा दुधनाळे यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनाकांनी सांगितले की, ड प्रभाग हद्दीत प्रशासनाकडून विक्रेते व फेरीवाल्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात होती. हातगाड्या, छोटी दुकाने काढा अन्यथा तीन दिवसात कारवाई होईल अशी दमदाटी केली जात होती. त्यामुळे विक्रेत्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. महानगरपालिकेकडून फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. फेरीवाल्यांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जाते. आठवडे बाजारांना परवानी द्यायची आणि  गरजू फेरीवाल्यांवर विक्रेत्यांवर कारवाई करायची हे अन्याय कारक आहे. यापुढे महापालिकेने कायद्याची अंमलबजावणी न केल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल. 

आंदोलकांनी अधिकारी पूजा दुधनाळे यांच्याशी चर्चा केली. फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्तांसोबत बैठक घेऊन लवकरच कार्यवाही सुरु केली जाईल, असे दूधनाळे यांनी सांगितले. या आंदोलनात महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे प्रमुख काशिनाथ नखाते, पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, सदस्य किरण साडेकर, शैलेंद्र गाडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण शेरखाने, इरफान चौधरी, सागर कापूरे, सखाराम केदार, लाला राठोड,अशोक पगारिया, मनोज रुपनवर, सुनील भोसले, संतोष बनगर, राजेश माने, नंदू आहेर, रवींद्र गायकवाड, सुषमा शेगावकर, स्वाती दिलापाक, ज्योती ढाकरे, अनाया सावंत, विशाल इचके, झरीना शेख,अंबालाल सुखावल प्रमोद बोंबले,भाऊ तांबे, रेखा कांबळे, अर्चना दिवेकर आणि बहुसंख्य विक्रेते सहभागी झाले.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories