ई-गव्हर्नन्समध्ये 'एससीईआरटी'ची उत्तम कामगिरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान
Mar 31 2026
49
ई-गव्हर्नन्समध्ये 'एससीईआरटी'ची उत्तम कामगिरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान
पुणे, ता. ३१ - राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. यामुळे 'एससीईआरटी'ला ई-गव्हर्नन्स प्रशासकीय सुधारणा स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला.
याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेला गौरविण्यात आले. संस्थेच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे आणि उपसंचालक ज्योती शिंदे यांनी हा सन्मान स्विकारला. तत्कालीन संचालक राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यात आले.
'एससीईआरटी'ने विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेचे आणि एकूण प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निपुण माध्यमातून इयत्ता दुसरी ते पाचवीतील महाराष्ट्र उपक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण प्रयोग राबवले आहेत. डिजिटल प्रशासनसाठी १५२ पैकी १३५.५ गुण मिळवले, ई-ऑफिस प्रणालीत ९६.९४ टक्के फाइल्स निकाली काढल्या, सर्व ९२ कर्मचारी ई-ऑफिसवर सक्रिय आहेत.