news
clock
बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक 

पिंपरी, ता. ७ - चाकणमध्ये बारामतीहून कार विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीची बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ४२ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. आरोपी गणेश ठाकरे आणि समीर महल्ले यांच्यासह कार व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती येथील हुजेब फिरोज बागवान हे त्यांचे मित्र अरबाज शेख यांची चारचाकी गाडी विक्रीसाठी चाकणला आले होते. यावेळी आरोपी गणेश ज्ञानदेव ठाकरे याने फोनवरुन संपर्क साधत गाडी खरेदीबाबत बोलणे केले. रविवारी (ता. ५) चाकणमधील माणिक चौकात ३ लाख ५० हजार रुपयांत व्यवहार ठरला. व्यवहारा दरम्यान आरोपीने ५०० रुपयांच्या नोटांचे सहा बंडल प्लास्टिकमध्ये गुंडाळून दिले आणि उर्वरित ५० हजार रुपये वाहन ट्रान्सफरनंतर देण्याचे सांगितले. पैसे घेतल्यानंतर आरोपी गाडीसह पसार झाला. मात्र, बंडल उघडून पाहिल्यावर वरची आणि खालची नोट खरी होती आणि मधल्या सर्व नोटा खोट्या आढळल्या. हे समजताच बागवान यांनी तातडीने चाकण पोलीस ठाण्यात धाव घेतली.

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास करत गणेश ज्ञानदेव ढाकरे आणि समीर दिनकर महल्ले या दोघांना अटक केली. बागवान यांची चारचाकी गाडी, ४२ लाख ५० हजार रुपयांच्या खेळण्यातील नोटा, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच नोटांचे बंडल तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories