news
clock
सांगवी-बोपोडी पुलावरील सुशोभिकरण व विद्युत रोषणाईचे उद्घाटन

सांगवी-बोपोडी पुलावरील सुशोभिकरण व विद्युत रोषणाईचे उद्घाटन

सांगवी-बोपोडी पुलावरील सुशोभिकरण व विद्युत रोषणाईचे उद्घाटन

पिंपरी, ता. ७ - मुळा नदीवरील सांगवी-बोपोडी पुलाचे नामकरण व पुलावरील सुशोभिकरण व विद्युत रोषणाईचा उद्घाटन समारंभ सोमवारी (ता. ६) पार पडला. या पुलाचे 'सरकार शितोळे सेतू' असे नामकरण करण्यात आले आहे. देखणी विद्युत रोषणाई केलेला हा पुल आता आकर्षक दिसत आहेत. पुलावरील वाहतूक आता सुरु झाली आहे.  

या समारंभाला महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक हर्षल ढोरे, राजू बनसोडे, उज्ज्वला ढोरे, तृप्ती कांबळे, डॉ. धम्मरत्न गायकवाड, शिवराज शितोळे उपस्थित होते.

सन २०२४ मध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचे उ‌द्घाटन झाले. ७६० मीटर लांबीचा हा पूल उभारण्यासाठी ४० कोटी रुपये खर्च आला आहे. सुशोभीकरण कामासाठी गेल्या चार-पाच महिन्यांपासून पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली होती. सुशोभीकरण कामासाठी अंदाजे १० महिन्यांचा कालावधी लागला. सुशोभिकरणासाठी उभारलेल्या कमानीची उंची २६ मीटर आहे, या कमानीचे काम वास्तुविशारद श्रुती शहा यांनी केले आहे. या कमानीवरील विद्युत रोषणाई अतिशय सुंदर दिसते आहे. 

सांगवी-बोपोडी पुलाचे काम पूर्ण झाल्याबद्दल स्थानिक नागरीकांनी समाधा व्यक्त केले आहे. मात्र, या पुलावर दुभाजक नसल्याने गैरसोय आहे. बोपोडी मार्गे सांगवीकडे येण्यासाठी या पुलावर दुभाजक तयार करावा, अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories