पिंपरी-चिंचवड
वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने भर रस्त्यात गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा
Mar 06 2026
54
वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने भर रस्त्यात गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा
पिंपरी, ता. ६ - वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांनी गुरुवारी (ता. ५) गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेला भारतीय न्याय संहिता - २०२३ चे कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस बजावली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला सुमारास आंबेडकर पुतळा चौकाकडून शगुन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार करत होती. खाणाखुणा करुन सार्वजनिक ठिकाणी येणा-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करत होती. तिच्या या वर्तनामुळे सार्वजनिक सभ्यतेचा भंग होत होता.
पोलिसांनी या महिलेविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.