news
clock
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये मिळणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये मिळणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये मिळणार

पिंपरी, ता. ४ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरमहा हप्त्याने परतफेडीच्या अटीवर एकरक्कमी प्रत्येकी १५ हजार रुपये आगाऊ दिले जाणार आहेत. याबाबतचा आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणाच्या निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याचा धोरणात्मक निर्णय स्थायी समिती आणि महापालिका सभेने यापूर्वीच मंजूर केला आहे. त्यानुसार प्रत्येकी १५ हजार रुपये अग्रिम अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटप केला जाणार आहे. 

सहाव्या वेतन आयोगानुसार ग्रेड वेतन ४८०० रुपयांपेक्षा कमी किंवा सातव्या वेतन आयोगानुसार पे-लेव्हल एस-१७ (वेतन संरचना ४७,६०० – १,५१,१००) पेक्षा कमी असणाऱ्या पात्र सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऐच्छिक स्वरुपात या सण अग्रिमचा लाभ मिळणार आहे. सण अग्रिम म्हणून दिली जाणारी १५ हजार रुपयांची रक्कम सदर लाभ घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मे २०२६ पासून दरमहा १५०० रुपयांप्रमाणे १० हप्त्यांमध्ये परतफेड केली जाणार आहे. ही सण अग्रिमाची रक्कम १४ एप्रिल २०२६ पूर्वी अदा करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  जयंती उत्सव सणाचा आनंद द्विगुणित होणार...

''भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महापालिका उत्साहात साजरी करीत असते. शिवाय जयंतीचे औचित्य साधून भव्य स्वरुपात पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे देखील आयोजन महापालिका दरवर्षी करीत असते. महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता या जयंती सणासाठी एकरक्कमी सण अग्रिम देऊन या जयंती उत्सव सणाचा आनंद द्विगुणित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.''

– रवी लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका


कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान....

''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, सामाजिक न्याय आणि प्रगतीचा दिलेला संदेश आजही आपल्या कामकाजाला दिशा देणारा आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना सण अग्रिम देण्याचा निर्णय हा केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचाही एक प्रयत्न आहे.''

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी--चिंचवड महापालिका


 



\

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories