news
clock
सात वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, मोशी परिसरात नागरिकांचा संताप

सात वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, मोशी परिसरात नागरिकांचा संताप

सात वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, मोशी परिसरात नागरिकांचा संताप

पिंपरी, ता. ४ - मोशी परिसरात संतापजनक घटना घडली आहे. विनायकनगर येथील शिवशंभो कॉलनीमध्ये एका ४० वर्षीय इसमाने सात वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. रामू कुंजल निसाद (वय ४०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. २) रोजी सायंकाळी आरोपीने पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तसेच, ही बाब कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर, शुक्रवारी (ता. ३) एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पिडीत मुलीची आई व आत्या यांनी खिडकीतून हा प्रकार पाहिला. त्यांनी तत्काळ एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

 पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (१), ६५ (२), ७४, ३५१ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) कायद्यानुसार कलम ४, ६, ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिस तपास करत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories