सोसायटीच्या पार्किंगमध्ये तीनपत्ती जुगार; 1.14 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोसायटीच्या पार्किंगमध्ये तीनपत्ती जुगार; 1.14 लाखांचा मुद्देमाल जप्त

चिंचवड | 31 ऑगस्ट 2026 : वेताळनगरमधील मोरया हाउसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये पैशांवर तीनपत्तीचा जुगार खेळणाऱ्या 5 जणांवर चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. आरोपींकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 14 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास मोरया हाउसिंग सोसायटीच्या बिल्डिंग क्रमांक 5 च्या पार्किंगमधील मोकळ्या जागेत करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रीतम विलास फरांदे यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी सुरेश उत्तम आरसुळ वय ६५ रा.बिजलीनगर चिंचवड, देवीदास रामदास डाकले वय ४६, मणिगंडन विरपेरमल थेवर वय ३६ , दौलत मकबूल खान वय ४४ तिघे रा.मोरया हाउसिंग सोसायटी वेताळनगर चिंचवड आणि बुद्धानंद मारुती बनसोडे वय ५५ रा.दळवीनगर चिंचवड यांच्याविरोधात कारवाई केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सोसायटीच्या मोकळ्या जागेत पैशांवर तीनपत्तीचा जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्यांच्याकडून जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते, रोख रक्कम आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले. जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत 1 लाख 14 हजार 700 रुपये आहे.

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 432/2026 नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमानुसार पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories