फुगेवाडी विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलिस आयुक्तांना निवेदन

पिंपरी, ता. ३० - पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी, दापोडी परिसरात हातभट्टीची विषारी दारु प्यायल्यामुळे १३ नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना म्हणजे  शहरात सुरु असलेल्या अवैध दारु रॅकेटचा थेट परिणाम आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणातील दोषींवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.

याबाबत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  या घटनेतील  सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी,  उच्चस्तरीय चौकशी करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, शहरातील सर्व अवैध दारू अड्ड्यांवर संयुक्त धाडसत्र राबवावे,  भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. मृतांच्या कुटुंबियांना पुनर्वसनासाठी तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. 

पोलिस आयुक्तांना निवेदन देताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप शहराध्यक्ष राजू सावळे, शहर सचिव रुपेश पटेकर व चंद्रकांत दावले, शहर संघटक विनोद भंडारी,  उप विभाग अध्यक्ष अलेक्सझांडर अप्पा मोझेस, सागर भोकेरे, मनोज महाजन, पंढरी शेवळे उपस्थित होते. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories