पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना पदावरुन हटवले, ६० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राज्य शासनाची कारवाई

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना पदावरुन हटवले, ६० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राज्य शासनाची कारवाई

 पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना पदावरुन हटवले, ६० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राज्य शासनाची कारवाई  

सत्यवान किशनराव उबाळे यांची महापालिकेच्या 'वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकारी' पदावर नियुक्ती 

पिंपरी, ता. ३० - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ६० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना पदावरुन हटवण्यात आले आहे.  त्यांच्या जागी नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी  सत्यवान किशनराव उबाळे यांची 'वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकारी' पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने २९ मे २०२६ रोजी जारी केले आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी हा गैरव्यवहार उघकीस आणला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिकेने चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यानंतर राज्य शासनाने जैन यांना पदावरुन हटवण्याची कारवाई केली आहे.  त्यांच्या जागी 

 नवी मुंबई महानगरपालिकेत मुख्य लेखा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले  सत्यवान किशनराव उबाळे यांची बदली आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 'वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकारी' या पदावर करण्यात आली आहे. 

बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या जागी त्वरित रुजू व्हावे. सध्याच्या नियंत्रक अधिकाऱ्यांनी बदलीस पर्यायी अधिकारी यायची वाट न पाहता, स्थानिक व्यवस्था करून संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ कार्यमुक्त करावे, जेणेकरून प्रशासकीय कामकाजात कोणताही अडथळा येणार नाही, असे शासनाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories