विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी पिंपरी-चिंचवड व पुण्यातील एकूण ९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
May 30 2026
46
विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी पिंपरी-चिंचवड व पुण्यातील एकूण ९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
पिंपरी, ता. ३० - पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी व पुण्यातील हडपसर परिसरातील हातभट्टीची विषारी दारु पिल्याने अनेक नागरीकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे व पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील निलंबित अधिकाऱ्यांमध्ये दापोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, गुन्हे शोध विभागाचे प्रमुख, फौजदार राजू भास्कर, तसेच कर्मचारी जयदीप सोनावणे, नवनाथ पोटे, सागर जाधव आणि विशाल काळे यांचा समावेश आहे.
पुण्यातील निलंबित अधिकाऱ्यांमध्ये संजय मोगले हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी , गुन्हे शोध पथक व सहाय्यक पोलिस निरीक्षक हसिना शिकलगार यांचा समावेश आहे.
या निलंबित अधिकाऱ्यांनी सदर गंभीर घटनेच्या प्राथमिक तपासात निष्काळजीपणा केला आहे. तसेच या अधिकाऱ्यांच्या हद्दीत अवैध व विषारी दारूची विक्री सुरु असताना त्यावर योग्य कारवाई केलेली नाही, या हलगर्जीपणामुळे या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलबंनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
- Public Safety, Excise Violation, Strict Action, Officials Suspended, Police Accountability.
- Law Enforcement,
- Police Suspension, Negligence in Investigation, Illegal Liquor,
- फौजदार, उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्राथमिक तपास, निष्काळजीपणा,
- पिंपरी-चिंचवड पोलिस, पुणे पोलिस, निलंबन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शोध विभाग,
- फुगेवाडी, हडपसर, विषारी दारू, हातभट्टी दारू, मृत्यू प्रकरण,