'फुगेवाडी विषारी दारु घटनेतील' रुग्णांच्या प्रकृतीची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून विचारपूस
May 30 2026
34
'फुगेवाडी विषारी दारु घटनेतील' रुग्णांच्या प्रकृतीची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून विचारपूस
फुगेवाडीतील विषारी दारु प्राशन केलेल्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी, ता. ३० - फुगेवाडी येथील विषारी दारु प्राशन केलेल्या रुग्णांना महापालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकतीच वायसीएम रुग्णालयाला भेट दिली.
रुग्णालयात दाखल रुग्णांवर आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वला अंदूरकर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार, तसेच वायसीएम रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
- Free Medical Treatment, Patient Care, Emergency Healthcare,
- Hospital Visit, Health Department,
- Municipal Commissioner, Dr Vijay Suryawanshi,
- Fugawadi, Toxic Liquor Case, Hooch Tragedy, YCM Hospital, Yashwantrao Chavan Memorial Hospital
- महापालिका आयुक्त, डॉ. विजय सूर्यवंशी,
- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय,
- विषारी दारू दुर्घटना, रुग्ण उपचार, वायसीएम रुग्णालय,
- फुगेवाडी, विषारी दारू प्रकरण