फुगेवाडी परिसरात दोन दिवसांत पाच जणांचा मृत्यू,‌ हातभट्टीच्या दारूमुळे मृत्यू झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा

फुगेवाडी परिसरात दोन दिवसांत पाच जणांचा मृत्यू,‌ हातभट्टीच्या दारूमुळे मृत्यू झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा

 फुगेवाडी परिसरात दोन दिवसांत एकामागोमाग पाच जणांचा मृत्यू, हातभट्टीच्या दारूच्या सेवनामुळे झाल्याची चर्चा 

पिंपरी, ता. 28 -  फुगेवाडी परिसरात बुधवारी (ता.‌ 27, )आणि गुरुवारी (ता.28)  एका पाठोपाठ एक पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हातभट्टीच्या दारूच्या सेवनामुळे झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. पोलिसांनी मात्र या शक्यतेला नाकारले आहे.

लागोपाठ मृत्यू झालेल्या नागरिकांची नावे परिसरातील फलकावर लिहिलेली आहेत. हे मृत्यू लागोपाठ झाल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण पसरले, हातभट्टीच्या दारूच्या सेवनामुळे हे मृत्यू झाले अशी चर्चा सुरू झाली.

याबाबत बोलताना, दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी हातभट्टीच्या दारुमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगितले.  

मृतांची नावे - पांडुरंग फुगे (वय ५७), विजय राठोड (वय ३१), राजेंद्र राठोड (वय ३४), राजेंद्र राजपूत (वय ५३), अकबर पठाण (वय  ५२)




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories