विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी 'राष्ट्रवादी'च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलिस अधिकाऱ्यांची भेट

विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी 'राष्ट्रवादी'च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलिस अधिकाऱ्यांची भेट

विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी 'राष्ट्रवादी'च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलिस अधिकाऱ्यांची भेट

पोलिस प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत दिले निवेदन  

पिंपरी, ता. २९ - पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी व पुण्यात हातभट्टीच्या विषारी दारुमुळे बुधवारी (ता. २७) व गुरुवारी (ता. २८) झालेल्या १३ जणांच्या संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड अप्पर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांची भेट घेतली. 

पदाधिकाऱ्यांनी आवाड यांना निवेदन देत पोलिस प्रशासनाचा गलथान कारभार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. फुगेवाडी परिसरातील हा बनावट दारुचा उद्योग पोलिसांना माहिती होता, पण पोलिसांनी त्यावर कारवाई केली नाही, असे नागरीक सांगत आहेत. या मुख्य गोष्टींसह इतर पोलिसांशी संबंधित बाबी या निवेदनात मांडल्या आहेत.   

निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इमरान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मयूर जाधव, कल्पनाताई घाडगे,  युवक विधानसभा अध्यक्ष ॲड. संतोष शिंदे सरचिटणीस रजनीकांत गायकवाड, वसीम पठाण, विद्यार्थी विधानसभा अध्यक्ष रिषभ भाडाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories