फुगेवाडी येथील विषारी दारुमुळे झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
May 29 2026
21
फुगेवाडी येथील विषारी दारुमुळे झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
पिंपरी, ता. २९ - फुगेवाडी येथे हातभट्टीच्या विषारी दारुमुळे बुधवारी (ता. २७) व गुरुवारी (ता. २८) झालेल्या ५ जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची झाल्याने दापोडी पोलीसांकडून तत्काळ चौकशी सुरु करण्यात आली. सदर प्रकरणात एकूण ५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून ३ आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने दिली आहे.
सदर प्रकरणी प्राथमिक चौकशी वरुन दापोडी पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम १०५ (सदोष मनुष्यवध), ११० (सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे), १२३ (गुन्हा करण्याचे उद्देशाने अपायकारक पदार्थव्दारे इजा करणे), १२५ (इतरांचे जीव धोक्यात आणणारी कृती), २७५ (अपायकारक पेयाची विक्री), ३ (५), तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई),६८,८१,८३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात एकुण ०५ आरोपी पोलीसांच्या ताब्यात असुन ०३ आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ताब्यात आहेत. सदर घटनेत आता पर्यंत एकुण ०७ इसम मृत्यू झाले असुन ३ जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येत आहे, असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सांगितले आहे.
- Alcohol Poisoning, Investigation Update, Hospitalized Victims, Law Enforcement,
- राज्य उत्पादन शुल्क विभाग, Criminal Investigation, गुन्हे शाखा, Crime Branch, गुन्हे, Criminal Case,
- विषारी दारू, Spurious Liquor, संशयास्पद मृत्यू, Suspicious Death, हातभट्टी दारू, Illegal Liquor
- फुगेवाडी, दापोडी, पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिस, Pimpri Chinchwad Police,