महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात  १ जून ते ३१ जुलैपर्यंत पावसाळी मासेमारी बंद राहणार

महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात १ जून ते ३१ जुलैपर्यंत पावसाळी मासेमारी बंद राहणार

महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात  १ जून ते ३१ जुलैपर्यंत पावसाळी मासेमारी बंद राहणार

पुणे, ता. २९ - मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छिमारांच्या जीवित व वित्त रक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार १ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार, नौका मालक, तांडेल आणि खलाशी यांनी शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories