news
clock
महापालिकेच्या संत तुकाराम महाराज संतपीठाच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन

महापालिकेच्या संत तुकाराम महाराज संतपीठाच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन

महापालिकेच्या संत तुकाराम महाराज संतपीठाच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन 

एकल तबलावादन व पखवाजवादन, शास्त्रीय गायन व अभंग गायन, कलाकारांना सहभागाचे आवाहन

पिंपरी, ता. ३० - महापालिकेचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळाच्या वतीने 'गांधर्व मंच' या आंतराराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये एकल तबलावादन व पखवाजवादन, शास्त्रीय गायन व अभंग गायन या स्पर्धा होणार आहेत. 

संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव सोहळा, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या स्थापनेचे १२५ वे वर्ष यानिमित्त ही भव्य स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धा वय ९ वर्षापासून ते ४० वर्षांपर्यंत विविध गटात होणार आहेत. स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरची असल्याने पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच देशभरातून आणि परदेशातूनही कलाकार या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ असे चार क्रमांक काढले जातील. विजेत्यांना रुपये १०,०००/-, १५,०००/-, २५,०००/-, ३५,०००/- आणि ५०,०००/- अशी रोख रक्कमेची पारितोषिके मिळणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.gandharvamanch.com या संकेतस्थळावर नावनोंदणी करायची आहे. सर्व फेऱ्या पार पडल्यानंतर ७ जूनला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. अधिकाधिक कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.

स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

- २ एप्रिलपासून स्पर्धेची नावनोंदणी सुरु होईल.

- २ ते २२ एप्रिल - स्पर्धकांची नोंदणी व ऑनलाईन ऑडीशन पाठवणे

- २२ ते ३० एप्रिल - विलंब शुल्कासह नावनोंदणी  

- ३० एप्रिल ते १० मे - ऑनलाईन परीक्षकांमार्फत ऑडीशन तपासणी 

- ११ मे ते १५ मे - स्पर्धेच्या कामकाजासाठी राखीव कालावधी 

- ५ ते ७ जून - संत तुकाराम महाराज संतपीठ येथे प्रत्यक्ष स्पर्धा 

-७ जून २०२६ - पारितोषिक वितरण व समारोप समारंभ

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories