news
clock
पुणे जिल्ह्यातील उद्योगांना पाइपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यात येणार - उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे जिल्ह्यातील उद्योगांना पाइपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यात येणार - उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे जिल्ह्यातील उद्योगांना पाइपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यात येणार - उद्योगमंत्री उदय सामंत 

पुणे, ता. ३० -  पुणे जिल्ह्यातील उद्योगांना पाइपद्वारे नैसर्गिक गॅस (पीएनजी) पुरवठा करण्यात येणार आहे आणि शंभर टक्के जोडणी पूर्ण करण्यासाठी 'मागेल त्या उद्योगाला जोडणी' ही योजनाही कार्यान्वित होईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. उद्योगांना पाइपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा योजनेसाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून विशेष शिबिराचे आयोजन करण्याची सूचना सामंत यांनी दिली आहे.

सध्या देशात व राज्यातील गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, पुणे महापालिकेचे अपर आयुक्त ओमप्रकाश दिवटे तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संतोष भिसे, महेश सुधाळकर आणि उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, "उद्योगांची उत्पादन क्षमता अबाधित राखणे ही राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नैसर्गिक गॅस हा उद्योगांसाठी स्वस्त आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोत आहे. त्यामुळे एमआयडीसी, गॅस वितरण कंपन्या आणि जिल्हा प्रशासन यांनी एकत्रितपणे नियोजन करुन प्रत्येक पात्र उद्योगापर्यंत पीएनजी जोडणी पोचवावी. घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कडक कारवाई करावी."

उद्योगांना पीएनजी जोडणी मोहिमेंतर्गत विशेष शिबिरे आयोजित करावी, त्याद्वारे अर्ज प्रक्रिया सुलभ करणे, तांत्रिक तपासणी जलदगतीने पूर्ण करणे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे या बाबींवर कार्यवाही करावी, अशा सूचना सामंत यांनी विविध विभागांना दिल्या आहेत. उद्योगांना सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एमआयडीसीमधील उपलब्ध जागा ३० वर्षांच्या दीर्घकालीन करारावर उपलब्ध करुन दिली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories