मोशी दुर्घटनेनंतर शहरातील कचरा टाकला जातोय .....कृष्णानगर स्पाईन रोडवर

मोशी दुर्घटनेनंतर शहरातील कचरा टाकला जातोय .....कृष्णानगर स्पाईन रोडवर

मोशी दुर्घटनेनंतर शहरातील कचरा टाकला जातोय .....कृष्णानगर स्पाईन रोडवर 

स्थानिक नागरिकांमध्ये संताप; कचरा तातडीने हटविण्याची मागणी

पिंपरी, ता. १३ जुलै २०२६ -  मोशी येथील कचरा डेपोमध्ये घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर शहरातील कचरा मोठ्या प्रमाणावर कृष्णानगर स्पाईन रोड परिसरात आणून टाकला जात आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे कृष्णानगर, महात्मा फुलेनगर, भीमशक्ती नगर, मोरे वस्ती या दाट लोकवस्तीच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मारुती गणपत जाधव यांनी प्रशासनाने तातडीने हा कचरा इतर ठिकाणी हलवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.  या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे की,  या ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत असून दुर्गंधी, माशा, डास आणि प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात शाळा, रुग्णालय तसेच हजारो नागरिकांची वस्ती असल्याने संसर्गजन्य आजार व रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोशी येथील दुर्घटनेत अनेक कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाने लोकवस्तीच्या मध्यभागी नवीन कचरा संकलन केंद्र उभारण्यास सुरुवात केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणी लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा प्रकार तत्काळ थांबवावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मारुती गणपत जाधव यांनी दिला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories